नाशिक ( इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरातील वेगवेगळ्या भागातून तीन मोटरसायकल चोरीली गेल्याच्या घटना घडल्या आहे. चोरीची पहिली घटना अमृतधाम भागात घडली. रविंद्र्र पुनमचंद परदेशी (रा.सरस्वतीनगर,मेरी लिंकरोड) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. परदेशी यांची एमएच १५ ईटी १५६७ मोटारसायकल गेल्या गुरूवारी रात्री त्यांच्या घरासमोर पार्क केलेली असतांना ती चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस नाईक काळे करीत आहेत. दुसरी घटना मेनरोड भागात घडली. पंचवटीतील राहूल बाळकृष्ण गांगुर्डे (रा.जंगम चौक,पंचवटी) हा युवक शुक्रवारी (दि.२५) मेनरोड भागात गेला होता. आरती ड्रिस्टीब्युटर्स समोरील विश्रामबाग कॉम्प्लेक्स मध्ये लावलेली त्याची एमएच १५ जीडी ७५७३ दुचाकी चोरटयांनी पळवून नेली. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस नाईक आहेर करीत आहेत. तर विद्या गणेश मोजाड (रा.एसटी कॉलनी,पळसे ता.जि.नाशिक) यांची एमएच १५ डीएक्स ८२०५ मोटारसायकल गुरूवारी (दि.२४) रात्री त्यांच्या घरासमोर लावलेली असतांना अज्ञात चोरट्यांनी ती चोरून नेली. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस नाईक पाटील करीत आहेत.