नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – फेकून दिलेल्या स्त्री जातीच्या अर्भकाचे बेवारस प्राण्यांनी मांस खाल्ल्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. अंबडच्या अंबिका नगर येथील दत्तनगर चुंचाळे शिवारात हा प्रकार समोर आला. ही सर्व घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झालेली आहे.
याप्रकरणी अंबड पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी ११ वाजेच्या दरम्यान एका अज्ञात इसमाने स्त्री जातीचे हे अर्भक भागवत बुधा पाटील यांच्या घरा जवळील पाण्याच्या टाकी जवळ टाकले होते. पण, बेवारस प्राण्यांनी या अर्भकाचे मास खाल्याने परिसरात वास येऊ लागला. स्थानिकांनी ही माहिती पोलिसांनी सांगताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर परिसरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे चेक केल्यानंतर हा प्रकार समोर आला. हे अर्भक एक दिवसाचे स्त्री जातीचे आहे. या घटनेचा पुढील तपास सह पोलिस निरीक्षक खतेले हे करीत आहेत.