नाशिक : घरफोडीत चोरट्यांनी सुमारे ४४ हजार रूपये किमतीची सोन्याचांदीचे दागिणे लंपास केले. ही घरफोडी जेलरोड भागात झाली. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुचिता रामचंद्र कांबळे (४० रा.देवी अपा.आढाव पेट्रोल पंपामागे) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. कांबळे कुटुंबिय ४ ते ७ जुलै रोजी बाहेरगावी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून कपाटातील ४४ हजार १०० रूपये किमतीचे सोने चांदीचे दागिणे चोरून नेले. अधिक तपास हवालदार भोळे करीत आहेत.