नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दोन अल्पवयीन मुली शनिवार पासून बेपत्ता झाल्या असून त्यांना कुणी तरी पळवून नेल्याचा संशय कुटुंबियांनी व्यक्त केला आहे. या दोन्ही घटना शहरातील वेगवेगळ्या भागात घडल्या. याप्रकरणी म्हसरूळ आणि अंबड पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पहिली घटना सिडको भागात घडली. या भागात राहणारी मुलगीही शनिवार पासून बेपत्ता आहे. तिच्या भावानेही तिला कोणी तरी पळवून नेल्याचा अंदाज वर्तविला असून याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस नाईक आवारे करीत आहेत. दुसरी घटना म्हसरूळ शिवारात घडली. येथील मुलगी शनिवार पासून बेपत्ता आहे. तिला कुणी तरी फुस लावून पळवून नेल्याचा अंदाज कुटुंबियांनी वर्तविला असून याप्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक माळी करीत आहेत.