नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पाथर्डी फाटा भागात भरधाव कारच्या धडकेत आजी आणि नाती जखमी झाल्याची घटना घडली. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात पसार झालेल्या अल्टो कारचालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अलका आनंदा पवार (रा.अमृत दर्शन सोसा.गुलमोहर नगर,पाथर्डी रोड) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. अलका पवार या आपल्या दोन नातींना सोबत घेवून घराबाहेर पडल्या होत्या. पाथर्डी रोडने त्या फेरफटका मारत असतांना पाठीमागून आलेल्या एमएच १२ क्यू एम ६५३८ या अल्टोकारने तिघींना धडक दिली. या अपघातात एका नातीच्या पायाचे बोट फॅक्चर झाले असून दुसरी जमिनीवर पडल्याने तिच्या कपाळास आणि आजीलाही गंभीर दुखापत झाली आहे. अपघातानंतर कारचालक आपल्या वाहनासह पसार झाला असून अधिक तपास हवालदरा गांगुर्डे करीत आहेत.