नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरातील वेगवेगळ्या भागातून पार्क केलेल्या ऑटोरिक्षासह दुचाकी चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी इंदिरानगर व सरकारवाडा पोलिस ठाण्यात नोंदी करण्यात आल्या आहेत. पहिली घटना कोर्टाच्या पार्किंगमध्ये झाली. मखमलाबाद येथील साहेबराव हेगडे (रा.हेगडे मळा,मातोरीरोड) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. हेगडे मंगळवारी (दि.२२) कामानिमित्त कोर्टात आले होते. जुने सिबीएस येथील कोर्ट पार्किंग परिसरात त्यांनी आपली दुचाकी एमएच १५ एई ६५५५ पार्क केली असता ती चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस नाईक गायकवाड करीत आहेत. दुसरी घटना वडाळागावात झाली. येथील हिमायत अली फैय्याज अली सैय्यद (रा.महाराष्ट्र किराणा दुकानासमोर) यांची अॅटोरिक्षा एमएच १५ झेड ९७४ गेल्या मंगळवारी (दि.२२) रात्री परिसरातील मल्हार किराणा दुकानाजवळील पत्र्याच्या शेडमध्ये लावलेली असतांना चोरट्यांनी ती पळवून नेली. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हयाची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार पारणकर करीत आहेत. दुसरी घटना सिबीएस बसस्थानक आवारात घडली.