पंचवटी आगारात पार्क केलेल्या एस.टी.च्या बॅट-या चोरीला
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पंचवटी आगारात बस स्टॅण्डमध्ये पार्क केलेल्या एस.टी.च्या बॅट-या चोरट्यांनी चोरुन नेल्या. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनंत दामोधर कुंदे (रा.सितागुंफारोड,पंचवटी) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. कुंदे हे एस.टी.महामंडळात कार्यरत असून त्यांची नेमणुक पंचवटी आगारात आहे. या आगारात लावलेल्या एमएच २० बीएल ०२१५ या बसची सुमारे आठ हजार रूपये किमतीच्या लिव्हगार्ड कंपनीच्या दोन बॅटरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना बुधवारी (दि.२३) रात्री घडली. अधिक तपास पोलिस नाईक गोसावी करीत आहेत.
पार्किंगमध्ये काढून ठेवलेल्या दोन सिलेंडरच्या रिकाम्या टाक्या चोरीला
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – हिरावाडीत पार्किंगमध्ये काढून ठेवलेल्या दोन सिलेंडरच्या रिकाम्या टाक्या चोरट्यांनी चोरून नेल्या. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विश्वनाथ गणपत वाबळे (७८ रा.गुरूसंपदा,शिवकृपा नगर) यांनी तक्रार दाखल केली आहे. वाबळे यांचे घरगुती गॅस सिलेंडर संपल्याने त्यांनी नेहमीप्रमाणे दोन्ही टाक्या इमारतीच्या पार्किंगमध्ये काढून ठेवल्या होत्या. गेल्या रविवारी (दि.२०) रात्री त्या चोरट्यांनी चोरून नेल्या. अधिक तपास पोलिस नाईक भोये करीत आहेत.