जेलरोड भागात ८४ हजाराची सोनसाखळी चोरट्यांनी केली लंपास
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जेलरोड भागात शतपावली करून घराकडे परतणा-या सासू व सूने पैकी एकीच्या गळय़ातील सोनसाखळी भामट्यांनी ओरबाडून नेल्याची घटना घडली. या चोरीप्रकरणी दिव्या दिनेश देवाणी (रा.सिंधी कॉलनी जेलरोड) यांनी तक्रार दाखल केली असून नाशिकरोड पोलिस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देवाणी या गुरूवारी (दि.२४) सकाळच्या सुमारास सासू प्राजवती देवाणी यांच्या समवेत शतपावलीसाठी घराबाहेर पडल्या होत्या. फिलोमिना शाळे जवळून त्या आपल्या घराकडे पायी जात असतांना ही घटना घडली. दुर्गा डोसा दुकाना समोरून दोन्ही सासू आणि सुन जात असतांना पाठीमागून आलेल्या दुचाकीस्वारांपैकी एकाने दिव्या देवाणी यांच्या गळ््यातील सुमारे ८४ हजार रूपये किमतीची सोनसाखळी गळय़ावर थाप मारून हिसकावून नेली. अधिक तपास उपनिरीक्षक काकड करीत आहेत.
जेलरोड भागात ३६ वर्षीय व्यक्तीची आत्महत्या
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ३६ वर्षीय व्यक्तीने जेलरोडवरील आपल्या राहत्या घरात गळफास लावून घेत आत्महत्या केली. गौतम हिरामण साळवे (रा.आदर्श सोसा.जेलरोड) असे आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे. साळवे यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. साळवे यांनी आपल्या राहत्या घरातील बेडरूममध्ये पंख्याच्या अँगलला ओढणी बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच भाऊ विजय साळवे यांनी त्यास तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अदिक तपास हवालदार बकाल करीत आहेत.