नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शनि चौकातील गोरेराम मंदिर भागात दुस-या मजल्यावरून पडल्याने ८० वर्षीय वृध्देचा मृत्यू झाला. दगूबाई काशिनाथ आटवणे (रा.भावीदिशा अपा. गोरेराम मंदिराजवळ, शनिचौक) असे मृत वृध्देचे नाव आहे. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आटवणे या गुरूवारी (दि.२४) सायंकाळच्या सुमारास दुस-या मजल्यावरील आपल्या घराच्या बाल्कनीत उभ्या असतांना ही घटना घडली. अचानक तोल गेल्याने त्या जमिनीवर कोसळल्या होत्या. या घटनेत गंभीर दुखापत झाल्याने कुटुंबियांनी त्यांना तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार शेळके करीत आहेत.