नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महामार्गावरील महाराजा हॉटेल भागात भरधाव दुचाकी घसरल्याने २४ वर्षीय तरूणाचा मृत्यू झाला. साहिल विमले गुप्ता (रा.फुलेनगर,पेठरोड) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गुप्ता गेल्या शनिवारी (दि.१९) आडगाव कडून रासबिहारी लिंकरोडच्या दिशेने आपल्या दुचाकीवर प्रवास करीत असतांना हा अपघात झाला होता. महाराजा हॉटेल समोर भरधाव दुचाकी घसरल्याने तो पडला होता. या घटनेत त्यास गंभीर दुखापत झाल्याने कुटूंबियांनी त्यास मुंबईनाका भागातील मेडीग्राम हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते. रविवारी (दि.२०) रात्री उपचार सुरू असतांना त्याचा मृत्यू झाला. याबाबत डॉ.ओमकार खैरणार यांनी दिलेल्या खबरीवरून पोलिस दप्तरी मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.