नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पेठरोडवरील शाहूनगर भागात सिगारेट दिली नाही या कारणातून टोळक्याने पानटपरीवर दगडफेक केली. त्यानंतर कुटुंबियास मारहाण केली. या घटनेत तीन जखमी झाले आहे. या मारहाणप्रकरणाची शकील रसिद सैय्यद (रा.पाण्याच्या टाकीजवळ,पाटकिनारी शाहूनगर पेठरोड) यांनी तक्रार दाखल केली असून आठ जणांविरूध्द पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोमीन उमर सैयद,नाशर रूस्तम सैय्यद,अली रूस्तम सैय्यद,उमर रूस्तम सैय्यद,हैदर अली सैय्यद,सुलतान हैदर सैय्यद,खलील अली सैय्यद व अफझल मुन्ना सैय्यद अशी दगडफेक करून कुटुंबियांना मारहाण करणा-या संशयित टोळक्याचे नाव आहे.
तक्रारदार शकिल सय्यद यांची आपल्या घर परिसरात असलेल्या पाटकिनारी पानटपरी आहे. रविवारी (दि.२०) सायंकाळच्या सुमारास तक्रारदार शकिल सय्यद भाऊ व वडिल आपल्या पानटपरी वजा दुकानावर असतांना ही घटना घडली. वडिल दुकानात बसलेले असतांना संशयित मोमीन सैय्यद तेथे आला. त्याने वडिलांकडे सिगारेटची मागणी केली. मात्र दुकानात सिगारेट शिल्लक नसल्याने वडिलांनी त्यास सिगारेट नसल्याचे सांगितल्याने हा वाद झाला. सिगारेट संपल्याचे सांगताच संशयित व त्याच्या साथिदारांनी वडिलांशी वाद घातला. यावेळी तक्रारदार शकिल सैय्यद यांनी मध्यस्थी करून वादावर पडदा पाडला असता काही वेळातच संशयित टोळक्याने गैरकायद्याची मंडळी जमवून व हातात लाठ्या काठ्या घेवून येत दुकानावर दगडफेक केली.
यावेळी शकिल सैय्यद यांनी समजून सांगण्याचा प्रयत्न केला असता संतप्त मोमीन सैय्यद याने शिवीगाळ करीत त्यांच्या डोक्यात लोखंडी रॉड मारून जखमी केले. तर नाशर सैय्यद याने भाऊ अल्ताफ सैय्यद यास लाकडी दांडक्याने मारहाण करून जखमी केले. यावेळी जावेद सय्यद हा आपल्या वडिलांसह काकाच्या मदतीला धावला असता त्यास उमर सैय्यद व खलील अली सैय्यद यांनी लाठ्या काठीने मारहाण जखमी केले. या घटनेत टोळक्याने दुकानावर दगडफेक करीत मालाचे व टपरीचे मोठे नुकसान केले असून अधिक तपास उपनिरीक्षक देवरे करीत आहेत.