नाशिक – नाशिक सेंट्रल जेल मधील अट्टल घरफोड्या करणारा आरोपीची चौकशी करुन त्याच्याकडून तब्बल साडेतेरा तोळे सोने पोलिसांनी हस्तगत केले आहे. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. नाशिक सेंट्रल जेल मधील अट्टल घरफोड्या करणारा आरोपीत अभिषेक उद्धव विश्वकर्मा (२४) रा. स्वामी नगर अंबड याला उपनगर पोलीस स्टेशन गुन्हयामध्ये कोर्टामार्फत ट्रान्सफर करून घेऊन पोलिसांनी चौकशी केल्यानंतर त्याने गुन्हा कबूल केला. त्यानंतर पोलिसांनी उपनगर पोलीस स्टेशनचे उर्वरित गुन्हे 8/22 व19/22 या घरफोडीतील सुद्धा सोन्याचे दागिने असा एकूण साडेतेरा तोळे सोन्याचा ऐवज तपासा दरम्यान हस्तगत केला. सदर आरोपीची इतर गुन्ह्यात सुद्धा ट्रान्सफर करून सखोल चौकशी केली जात आहे. उपनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश माईनकर, पोलीस निरीक्षक पगारे, क्राईम पोलीस निरीक्षक भालेराव एडमिन यांचे मार्गदर्शनाखाली उपनगर पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक विकास लोंढे कॉन्स्टेबल राहुल जगताप पोलीस नाईक विनोद लखन यांनी ही कामगिरी पार पाडली.घरफोड्या करणा-या आरोपीकडून पोलिसांनी हस्तगत केले साडेतेरा तोळे सोने