नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दोन जणांनी कोयत्याने केलेल्या हल्ल्यात एक तरुण जखमी झाला आहे. ही घटना औद्योगीक वसाहतीतील श्रमिकनगर भागात घडली. या हल्ल्याप्रकरणी अभिषेक चंद्रकांत पंडीत (२१ रा.राधाकृष्णनगर,श्रमिकनगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली असून सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्फराज खान व त्याचा मित्र (रा.दोघे श्रमिकनगर) अशी संशयित हल्लेखोरांची नावे आहेत. पंडीत शनिवारी (दि.१९) सायकांळी औषधे घेण्यासाठी परिसरातील गंगासागरनगर भागात गेले होते. औषधे खरेदी करून ते आपल्या दुचाकीवर घराकडे जात असतांना ही घटना घडली. अनोळखी मित्रा समवेत अॅक्टीव्हावर एमएच १५ डीआर ८०२९ आलेल्या व परिचीत असलेल्या सरफराज याने पंडीत यांची दुचाकी अडवून, तू माझ्या भावाला का शिवीगाळ केली याबाबत जाब विचारला. याप्रसंगी मी कश्याला शिवीगाळ करू तुझ्या भावास मी ओळखतही नाही असे सांगताच संतप्त झालेल्या दोघांनी पंडीत यांना शिवीगाळ करीत लाथाबुक्यांनी मारहाण केली. पंडीत जमिनीवर कोसळताच त्याने अॅक्टीव्हाच्या डिक्कीतील कोयता काढून डोक्यावर व उजव्या हातावर वार करून पोबारा केला. या घटनेत पंडीत जखमी झाला असून त्याच्या जबाबावरून पोलिस दप्तरी मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस नाईक कोरडे करीत आहेत.