नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – एमएसबी कॉलनीत झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी रोकडसह सुमारे ५० हजाराच्या ऐवज लंपास केला. याप्रकरणी उपनगर घरफोडीची गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरेखा सुरेंद्र कर्डीले (रा.ओकार बंगला,एमएसबी कॉलनी) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. कर्डीले कुटुंबिय दि.११ ते १६ नोव्हेंबर दरम्यान बाहेरगावी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद बंगल्याच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून बेडरूममधील कपाटात ठेवलेले २५ हजाराची रोकड आणि सोन्याची कर्नफुले असा सुमारे ४९ हजाराचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास उपनिरीक्षक गोसावी करीत आहेत.