नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दिंडोरीरोड भागात मानदुखीच्या आजाराने त्रस्त असलेल्या ६० वर्षीय वृध्दाने आत्महत्या केली. विजय एकनाथ व्यवहारे (रा.गजानन आशिष अपा.प्रभातनगर) असे मृत वृध्दाचे नाव आहे. वृध्दाने विषारी औषध सेवन केल्याने त्यांना जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. व्यवहारे गेल्या अनेक दिवसांपासून मानदुखीच्या आजाराने त्रस्त होते. औषधोपचार करूनही फरक पडत नसल्याने ते वैतागले होते. याच नैराश्यातून त्यांनी रविवारी (दि.२०) सकाळच्या सुमारास आपल्या राहत्या घरात विषारी औषध सेवन केले. ही घटना निदर्शनास येताच कुटुंबियानी त्यांना तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. याबाबत मुलगा मयुर व्यवहारे यांनी दिलेल्या खबरीवरून पोलिस दप्तरी मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास सहाय्यक उपनिरीक्षक राऊत करीत आहेत.