नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – घरात चक्कर येवून पडल्याने ५४ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना डीजीपीनगर भागात घडली. बाळू गणपत सापन (रा.धरमात्मा सोसा.विशाल पार्क जवळ डीजीपीनगर) असे मृत इसमाचे नाव आहे. सापन रविवारी (दि.२०) अचानक आपल्या राहत्या घरात चक्कर येवून पडले होते. या घटनेत त्यांच्या डोक्यास मार लागल्याने कुटुंबियांनी तात्काळ साईबाबा हॉस्पिटल येथे दाखल केले असता उपचार सुरू असता डॉ. राहूल गहाडे यांनी त्यांना मृत घोषीत केले. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलिस नाईक टिळेकर करीत आहेत.