नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहर वेगवेगळया भागात पार्क केलेल्या पाच दुचाकी चोरीला गेल्याची घटना घडली. याप्रकरणी पंचवटी, मुंबईनाका, भद्रकाली व गंगापूर पोलिस ठाण्यात नोंदी करण्यात आल्या आहेत. पहिली घटना एनडीपटेल रोड भागात घडली. सुरज सतीष बागुल (रा.गौरी अपा.बीएसएनएल समोर) यांची अॅक्टीव्हा एमएच १५ ईजे ४९३८ गेल्या शनिवारी (दि.१२) रात्री त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेली असतांना ती चोरट्यांनी चोरून नेली. तर पाचवी घटना व्दारका परिसरात घडली. जनरल वैद्यनगर राहणा-या ऐश्वर्या सतिष बिरारी (रा.वृंदावन कॉलनी) या गेल्या शुक्रवारी (दि.४) व्दारका परिसरातील पखालरोड भागात गेल्या होत्या. फातेमा कापड दुकानासमोर पार्क केलेली त्यांची अॅक्टीव्हा एमएच १५ एफएक्स ०९९५ चोरट्यांनी पळवून नेली. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुह्याची नोंद करण्यात आली आहेत. तिसरी घटना गोदाघाटावर घडली. पाथर्डी गाव परिसरातील अक्षय रमेश राऊत (रा.सुखदेवनगर) हे गेल्या २ ऑक्टोबर रोजी गोदाघाटावर गेले होते. गौरी पटांगण भागात त्यांनी आपली एमएच १७ बी डब्ल्यू ३९७० दुचाकी पार्क केली असता ती चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार शेवाळे करीत आहेत. चौथी घटना गंगापूररोड भागात घडली. विनीत नरेंद्र कुलकर्णी (रा.शिवपुरी चौक,उत्तमनगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. कुलकर्णी गेल्या शनिवारी (दि.११) भोसला मिलीटरी महाविद्यालयात गेले होते. कॉलेजच्या आवारात पार्क केलेली त्यांची एमएच १५ एचडब्ल्यू ११५८ दुचाकी चोरट्यांनी पळवून नेली. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार मोरे करीत आहेत. पाचवी घटना चौकमंडईत घडली. जाबीर सत्तार शेख (रा.सादिक गल्ली,वडाळागाव) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. शेख गेल्या बुधवारी (दि.२) सायंकाळच्या सुमारास जुने नाशिक भागात गेले होते. चौक मंडई येथील हुडगल्ली भागात त्यांनी आपली शाईन मोटारसायकल एमएच १५ एफके ७३८६ लावली असता ती चोरट्यांनी चोरून नेली.