नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – घरमालकास जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पाच जणांविरुध्द अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाडेकरूच्या सांगण्यावरून सराईत टोळक्याने हॉटेलमध्ये बसलेल्या घरमालकाल ही धमकी दिली. धमकी देणा-या पाच जणांपैकी चार जण पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. निलेश सोनवणे (रा.बजाजनगर,वाळूंज औरंगाबाद),आदित्य बिपीन वाहूळ (रा.सेव्हन हिल,औरंगाबाद),भारत गणेश रगडे, शरद रामदास मगर (रा. दोघे धामणगाव जि.जालना) व अमोल पुंडलिक खंदारे (रा. मोरवाडी,सिडको) अशी संशयितांची नावे असून सोनवणे वगळता अन्य संशयित पोलिस रेकॉर्डवरील आहेत. याप्रकरणी मनोज गंगाधर बुरकुले (रा.सुंदरबन कॉलनी,सिडको) यांनी तक्रार दाखल केली आहे. बुरकुले गुरूवारी (दि.१७) दुपारच्या सुमारास एक्सलन्सी इन या हॉटेल मध्ये कॉन्ट्रक्टर राजू प्रसाद यांच्याशी चर्चा करीत असतांना हा प्रकार घडला. संशयितांनी बुरकुले यांना गाठून पुर्वीचा भाडेकरू निलेश सोनवणे याच्या सांगण्यावरून टोळक्याने त्यांना धक्काबुक्की आणि शिवीगाळ केली. यावेळी टोळक्याने पैसे दिले नाही तर उचलून घेवून जावून जीवे मारू अशी धमकी दिली. अधिक तपास पोलिस नाईक शिरवले करीत आहेत.