नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ३९ वर्षीय महिलेने गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना म्हसरूळ गावातील राजवाडा भागात घडली. माधुरी प्रकाश जाधव असे आत्महत्या करणा-या महिलेचे नाव आहे. जाधव यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. माधुरी जाधव यांनी गुरूवारी (दि.१७) दुपारच्या सुमारास अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील लोखंडी पाईपास ओढणी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्यांचा मृत्यू झाला. याबाबत दिर संदेश जाधव यांनी दिलेल्या खबरीवरून आत्महत्येची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार बाराईत करीत आहेत.