नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महामार्गावरील गौळाणे फाटा भागात भरधाव अर्टिका कारने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार दांम्पत्य जखमी झाले. या अपघातानंतर कारचालक आपल्या वाहनासह पसार झाला आहे. किरण देविदास जाधव (२६) व प्रेरणा किरण जाधव (२४ रा.वेले सापले ता.त्र्यंबकेश्वर) असे कारच्या धडकेत जखमी झालेल्या दांम्पत्याचे नाव आहे. जाधव दांम्पत्य गुरूवारी घोटीकडून नाशिकच्या दिशेने आपल्या दुचाकीवर एमएच १५ एचजे ००३८ प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. महामार्गावरील गौळाणे फाटा येथील सीएनजी गॅस पंपासमोरून जाधव दांम्पत्य प्रवास करीत असतांना पाठीमागून भरधाव आलेल्या इर्टिका कारने एमएच १५ एचयू ८७०८ ने दुचाकीस धडक दिली. या अपघातात दांम्पत्य गंभीर जखमी झाले असून कारचालक आपल्या वाहनासह पसार झाला आहे. उपचार घेणा-या दांम्पत्याच्या जबाबावरून हा गुन्हा अंबड पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. आला असून अधिक तपास हवालदार टोपले करीत आहेत.