भरदिवसा घरफोडी; चोरट्यांनी १ लाख ३५ हजाराचा ऐवज केला लंपास
नाशिक : भरदिवसा झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे १ लाख ३५ हजाराच्या ऐवज लंपास केला. ही घरफोडी रेणूकानगर येथे झाली. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सबरीना झहिर सैय्यद (रा.डी -९ बिल्डींग,रेणूकानगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. सैय्यद कुटुंबिय सोमवारी (दि.१४) दुपारच्या सुमारास अल्पशा कामासाठी घराबाहेर पडले असता ही घटना घडली. भरदिवसा अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून बेडरूममधील कपाटात ठेवलेले तीस हजाराची रोकड आणि सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे १ लाख ३५ हजाराचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक गेंगजे करीत आहेत.
भर रस्त्यावरच तरूणाच्या हातातील मोबाईल दुचाकीस्वार त्रिकुटाने हिसकावून नेला
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गोविंदनगर भागात रस्त्याने फोनवर बोलत जाणा-या तरूणाच्या हातातील मोबाईल दुचाकीस्वार त्रिकुटाने हिसकावून नेल्याची घटना घडली. सत्यजित गजानन पाटील (२३ रा.कालिका पार्क उंटवाडी) या युवकाने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाटील मंगळवारी गोविंदनगर भागात गेला होता. रात्रीच्या सुमारास तो आपल्या घराकडे पायी जात असतांना ही घटना घडली. आर.डी.सर्कल परिसरातील प्रो चिकन शॉप समोरून तो मोबाईलवर बोलत जात असतांना पाठीमागून ट्रिपलसिट आलेल्या भामट्यांपैकी एकाने त्याच्या हातातील २० हजार रूपये किमतीचा मोबाईल हिसकावून पोबारा केला. अधिक तपास हवालदार भिल करीत आहेत.