नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात वेगवेगळय़ा भागात राहणा-या तीन जणांनी आत्महत्या केल्याची घटना बुधवारी घडली. या आत्महत्या करणा-यांमध्ये एका महिलेचा समावेश आहे. याप्रकरणी सातपूर, म्हसरूळ आणि इंदिरानगर पोलिस ठाण्यात मृत्यूच्या नोंदी करण्यात आल्या आहेत. पहिली घटना दिंडोरी रोड येथे घडली. येथील सोनी अमोल छलारे (३६ रा.उमर रो हाऊस कलानगर,दिंडोरीरोड) या महिलेने बुधवारी अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील बेडरूममध्ये छताच्या हुकास ओढणी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्यांचा मृत्यू झाला. सायंकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. याबाबत विकी परदेशी याने खबर दिल्याने म्हसरूळ पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार बाराईत करीत आहेत. दुसरी घटना पाथर्डी फाटा भागात घडली. यज्ञेश्वर दामोदर ठाकरे (५१ रा.आदित्य व्हिला,दामोदर चौक) यांनी बुधवारी दुपारच्या सुमारास अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील बेडरूममध्ये पंख्यास ओढणी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्यांचा मृत्यू झाला. याबाबत तुषार जगताप (रा.सिडको) यांनी दिलेल्या खबरीवरून इंदिरानगर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोद करण्यात आली असून अधिक तपास जमादार पाळदे करीत आहेत. तिसरी घटना सातपूर येथे घडली. येथील गुरूकुल कॉलनीत राहणारे विजय हिम्मतराव पवार (४४ रा.तारामंगल सोसायटी) यांनी बुधवारी अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील बेडरूममध्ये पंख्याच्या हुकास स्कार्प बांधून गळफास लावून घेतला होता. सकाळी ही बाब निदर्शनास येताच प्रशांत मेदगे यांनी त्यांना तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. याबाबत सातपूर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार पाटील करीत आहेत.