नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बाथरुममध्ये अंघोळीसाठी काढून ठेवलेले गरम पाणी अंगावर सांडल्याने अवघ्या दहा महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू झाला. जुना गंगापूर नाका परिसरातील श्री साई अपार्टमेंटमध्ये इंगळे यांच्या फ्लॅटमध्ये ही घटना घडली. आवेरा शुभम इंगळे (वय १० महिने) असे मृत बालिकेचे नाव आहे. आवेरा हिच्या आंघोळीसाठी शनिवारी (दि.१२) गरम पाणी काढण्यात आल होते. यावेळी बालिकेचा धक्का लागल्याने पाणी तिच्या अंगावर सांडले. यामुळे गंभीररित्या भाजलेल्या आवेराला तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तीन दिवस तिच्यावर उपचार करण्यात आले. मंगळवारी उपचार सुरू उपचार सुरू असतांना डॉ. राहूल पाटील यांनी तिला मृत घोषीत केले. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलिस नाईक जाधव करीत आहेत.