नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – २१ वर्षीय तरूणाने आपल्या राहत्या घरात गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना तिडके कॉलनीत घडली. ललीत सुनिल मोंडे (रा.घर नं.६० राहूलनगर,तिडके कॉलनी) असे मृत युवकाचे नाव आहे. मोंडे याच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट होवू शकले नाही. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ललीत मोंडे याने मंगळवारी दुपारच्या सुमारास आपल्या राहत्या घरातील छतास असलेल्या लोखंडी अॅगलला नॉयलॉन दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच कुटुंबियांनी त्यास तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता डॉ.राहूल पाटील यांनी तपासून मृत घोषीत केले. अधिक तपास पोलिस नाईक ठिगळे करीत आहेत.