नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वेगवेगळया भागात राहणा-या दोन अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या होण्याच्या घटना गुरूवारी घडल्या. या दोन्ही मुलींना कुणी तरी फुस लावून पळवून नेल्याचा संशय पालकांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी सरकारवाडा आणि आडगाव पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पहिली घटना फावडे लेन भागात घडली. कै. सुरेखाताई भोसले खो – खो प्रबोधनी वसतीगृहात राहणारी अल्पवयीन मुलगी गुरूवार दुपार पासून बेपत्ता आहे. तिला कोणी तरी पळवून नेल्याचा संशय व्यक्त केला जात असून याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक नेमाणे करीत आहेत
दुसरी घटना पंचवटी परिसरात घडली. येथे राहणारी अल्पवयीन मुलगी गुरूवारी शाळेत गेली होती. सायंकाळच्या सुमारास ती पंचवटी महाविद्यालय परिसरातून बेपत्ता झाली असून तिला कुणी तरी फुस लावून पळवून नेल्याचा अंदाज बांधला जात आहे. याबाबत मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून आडगाव पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास जमादार गायकवाड करीत आहेत.