नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सायखेडा रोड भागात बाभळीच्या झाडाला गळफास लावून घेत २८ वर्षीय युवकाने आत्महत्या केली. राकेश रामेश्वर रॉय (रा.मकरंद कॉलनी,सायखेडा रोड जेलरोड) असे आत्महत्या करणा-या तरूणाचे नाव आहे. राकेशच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रॉय याने गुरूवारी अज्ञात कारणाने आपल्या घराच्या पाठीमागे असलेल्या मोकळया मैदानातील बाभळीच्या झाडाला रूमाल बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्याचा मृत्यू झाला. याबाबत गंगाधर रोकडे यांनी दिलेल्या खबरीवरून मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार बकाल करीत आहेत.