नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पेठरोडवरील एस.टी.वर्कशॉप जवळ भरधाव पिकअपने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार महिला जखमी झाली. या घटनेत दुचाकीचेही मोठे नुकसान झाले असून पिकअप चालक आपल्या वाहनासह पसार झाला आहे. याप्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. शालिनी शशिकांत लोणारी (६५ रा. साईश्रध्दा अपा.शिवपॅलेसच्या पाठीमागे पेठरोड) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. लोणारी या बुधवारी (दि.९) रात्रीच्या वेळी आपल्या अॅक्टीव्हा एमएच १५ जीक्यू ०९९७ दुचाकीवर पेठरोडने प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. राहू हॉटेलच्या दिशेने भरधाव जाणा-या पिकअपने एमएच १५ एचएच २१४९ अॅक्टीव्हास पाठीमागून धडक दिली. शिव पॅलेस हॉल समोर हा अपघात झाला. या घटनेत लोणारी जखमी झाल्या असून त्याच्या दुचाकीचेही मोठे नुकसान झाले आहे. अधिक तपास हवालदार बाराईत करीत आहेत.