नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पंचवटीतील कर्णनगर भागात वावरणा-या एका सराईत गुन्हेगाराच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून त्याच्या ताब्यातून गावठी कट्यासह जीवंत काडतुसे हस्तगत केले आहे. चेतन यशवंत इंगळे (मुळ रा.मल्हारखान झोपडपट्टी,हल्ली ओम अपा.पेठरोड) असे पिस्तूल बाळगणा-या संशयिताचे नाव असून तो पोलिस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. ही कारवाई शहर गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती युनिटने केली. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पंचवटीतील कर्ननगर भागात वावरणा-या एका सराईताकडे गावठी पिस्तूल असल्याची माहिती मध्यवर्ती शाखेस मिळाली होती. त्यानुसार बुधवारी पथकाने सापळा लावला असता संशयित पोलिसांच्या जाळयात अडकला. त्याच्या अंगझडतीत गावठी कट्यासह दोन जीवंत काडतुसे असा सुमारे ३५ हजाराचा मुद्देमाल मिळून आला असून, याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात आर्म अॅक्ट आणि मनाई आदेशाचे उलंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक डॉ.अंचल मुदगल यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक धर्मराज बांगर,उपनिरीक्षक माणिक गायकर,दत्तात्रेय कडनोर,सुनिल माळी,जमादार शंकर गोसावी,हवालदार शेरखान पठाण,श्रीराम सपकाळ,किशोर देसले,संजय गामणे,समिर चंद्रमोरे,रामकृष्ण वाघ,आनंदा काळे पोलिस नाईक संदिप पवार व शिपाई प्रजित ठाकूर आदींच्या पथकाने केली.
……