नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सिडकोतील वृंदावन कॉलनीत भरदिवसा झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे ६२ हजाराच्या ऐवज लंपास केला. या घरफोडीत चोरट्यांनी सोन्याचांदीचे दागिणे आणि लॅपटॉपचा चोरुन नेले. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अर्चना शरद केदारे (रा.शांतीधाम अपा.वृंदावन कॉलनी,डीजीपी नगर २) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. केदारे या मंगळवारी (दि.८) दुपारच्या सुमारास अल्पशा कामासाठी घराबाहेर पडल्या असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून बेडरूममधील लोखंडी कपाटातील सोन्याचांदीचे दागिणे आणि बैठक रूममधील लॅपटॉप असा सुमारे ६२ हजार २०० रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक वसंत खतेले करीत आहेत.