नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अंबड लिंक रोड भागात भरधाव दुचाकीवरून पडल्याने ६० वर्षीय चालकाचा मृत्यू झाला. समाधान श्रीपाद क्षीरसागर (रा.वास्तूनगर,अशोकनगर) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. क्षीरसागर बुधवारी सकाळच्या सुमारास अंबड लिंकरोडने आपल्या दुचाकीवर प्रवास करीत असतांना ही घटना घडली होती. अजिंठा हॉस्पिटल भागात अचानक धावत्या दुचाकीवरून पडल्याने ते जखमी झाले होते. बेशुध्द अवस्थेत मुलगा गौरव क्षीरसागर यांनी त्यांना तातडीने जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार चव्हाण करीत आहेत.