हॉस्पिटलमधून महिला डॉक्टरची पर्स चोरट्यांनी केली लंपास
नाशिक : पेठरोडवरील नामको हॉस्पिटल येथे महिला डॉक्टरची पर्स कॅबीनमधून चोरून नेल्याची घटना घडली. पेशंट तपासणीसाठी डॅाक्टर गेल्या असता ही चोरट्यांनी पर्स लंपास केली. पर्स मध्ये महागड्या गॉगलसह वाहनांच्या चाव्या आणि महत्वाची कागदपत्र होती. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ.विशाखा सागर जहागिरदार (रा.गोविंदनगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. डॉ. जहागिरदार या नामको हॉस्पिटलचे काम बघतात. शनिवारी (दि.२) दुपारच्या सुमारास त्या नेहमीप्रमाणे पर्स आपल्या कॅबीनमध्ये ठेवून अॅडमिट पेशंटच्या तपासणीसाठी गेल्या असता ही घटना घडली. कॅबीनमध्ये कुणी नसल्याची संधी साधत अज्ञात भामट्यांनी त्यांची पर्स चोरून नेली. पर्समध्ये रेबन कंपनीचा गॉगल,छोटे पाकिट,घराची व वाहनांच्या चाव्या,विविध बँकाचे डेबिट आणि क्रेडिट कार्ड आणि महत्वाचे कागदपत्र होते. अधिक तपास पोलिस नाईक माळवाळ करीत आहेत.
विषारी औषध सेवन करून आत्महत्या
नाशिक – ४० वर्षीय व्यक्तीने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याची घटना वज्रेश्वरी झोपडपट्टीत राहणा-या सदर इसमाच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. आण्णासाहेब कोंडाजी हळवर (मुळ रा.संगमनेर,हल्ली वज्रेश्वरी झोपडपट्टी) असे मृत इसमाचे नाव आहे. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आण्णासाहेब हळवर यांनी मंगळवारी सायंकाळच्या सुमारास अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात विषारी औषध सेवन केले होते. ही बाब निदर्शनास येताच पत्नी सोनाली हळवर यांनी त्यास तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास पोलिस नाईक माळवाळ करीत आहेत.