नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिलापूर उड्डाणपूल परिसरातील रेल्वे लाईनवर धावत्या रेल्वेने धडक दिल्याने ४० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गौतम दगडूजी निकाळजे (रा.शिलापूर टोल नाक्याजवळ,माडसांगवी) असे रेल्वेच्या धडकेत ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. निकाळजे बुधवारी (दि.९) सायंकाळच्या सुमारास शिलापूर उड्डाणपूलाखालील रेल्वे पोल नं.१९५.३ येथे रेल्वे रूळ ओलांडत असतांना हा अपघात झाला. रेल्वे पटरी वरून ते जात असतांना अचानक आलेल्या रेल्वेच्या धक्यात त्यांचा मृत्यू झाला. याबाबत भगवान निकाळजे यांनी दिलेल्या खबरीवरून पोलिस दप्तरी मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार लोहकरे करीत आहेत.