नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अंबड लिंक रोड परिसरातील संजीवनगर भागात मंगळवारी रात्री अज्ञात हल्लेखोरांनी युवकाचा खून केल्याची घटना घडली आहे. या तरुणाच्या मानेवर धारदार शस्त्राने वार करण्यात आले असून त्यात युवकाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर अज्ञात हल्लेखोर पसार झाले आहे. सदरेआलम मोहम्मद शब्बीर शेख (वय २०,रा. संजीनगर) असे मृत युवकाचे नाव आहे. अंबड लिंक रोड भागातील संजीवनगर परिसरातील नुरी मस्जीद मागे मोकळ्या मैदानावर ही घटना मंगळवारी रात्री १० च्या सुमारास घडली.
या घटनेची माहिती अंबड पोलिसांना रात्री साडे दहा वाजता समजल्यानंतर पोलिस आयुक्त नाईकनवरे उपायुक्त विजय खरात, सहाय्यक आयुक्त सोहेल शेख, अंबड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख, पोलीस निरीक्षक गुन्हे श्रीकांत निंबाळकर, सहायक पोलिस निरीक्षक गणेश शिंदे आदींच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. यानंतर गंभीर जखमी शेखला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी अंबड पोलिसांनी अज्ञात हल्लेखोरांवर गुन्हा दाखल केला आहे. या खूनाच्या तपासासाठी विविध ठिकाणी पोलिसांनी पथके रवाना केली आहेत. या प्रकरणी अंबड पोलिसांनी अज्ञात हल्लेखोरांवर गुन्हा दाखल केला आहे. दोन महिन्यात या भागात चार खून झाले आहे.