नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तपोवनरोड भागात आई वडील बाहेरगावी गेलेले असतांना १४ वर्षीय बालकाने आपल्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. हर्ष सुशील गोरमारे (रा.करमा गॅलेक्सी,मारूती वेफर्स समोर) असे मृत मुलाचे नाव आहे. हर्षच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हर्ष गोरमारे याने रविवारी (दि.६) आपल्या राहत्या घरातील बेडरूममध्ये अज्ञात कारणातून पंख्यास ओढणी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्याचा मृत्यू झाला. रात्री आई वडिल बाहेरगावाहून परतल्यानंतर ही घटना उघडकीस आली. याबाबत वडिल सुशिल गोरमारे यांनी दिलेल्या खबरीवरून भद्रकाली पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार सोनवणे करीत आहेत.