नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -औद्योगीक वसाहतीतील महालक्ष्मीनगर भागात बापलेकाने शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी देत दांम्पत्यास बेदम मारहाण केल्याची घटना घडली. या घटनेत जखमी पतीच्या डोक्यात लोखंडी पाईप मारण्यात आल्याने तो जखमी झाला आहे. याप्रकरणी दिगंबर विलासराव दराडे (५० रा.निलांजन हाईटस,प्रणय स्टॅम्पींग कंपनी जवळ,महालक्ष्मीनगर) यांनी तक्रार दाखल असून अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काशिराम प्रसाद व लल्लू प्रसाद अशी दांम्पत्यास मारहाण करणा-या बापलेकाचे नाव आहे. दराडे व त्यांच्या पत्नी रविवारी (दि.६) सायंकाळच्या सुमारास त्यांच्या बिल्डींगच्या गेटचे काम करीत असतांना ही घटना घडली. दोघा बापेलेकाने गेट कामाची कुरापत काढून दांम्पत्यास शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी देत दांम्पत्यास बेदम मारहाण केली. या घटनेत बापलेकाने दराडे यांच्या डोक्यात लोखंडी पाईप मारल्याने ते जखमी झाले असून अधिक तपास पोलिस नाईक टिळेकर करीत आहेत.