नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भंगार व रद्दीच्या गोडाऊनला आज पहाटे आग लागल्याची घटना जेलरोड येथील जुना सायखेडा रोड भगवती लॉन्सजवळ घडली. या आगीत दीड लाखाचे नुकसान झाल्याचे बोलले जात आहे. अग्निशमक दलाचे जवान वेळीच घटनास्थळी पोहचल्याने इतर दुकाने आगीपासून बचावले. आयुब रशीद खान (रा. वडाळा गाव, साहेबानगर, नाशिक) यांच्या मालकीचे भंगार व रद्दीचे गोडावून आहे. त्यात रद्दी, प्लास्टिक, काचेच्या बाटल्या मोठ्या प्रमाणात होते. आज सकाळी नागरिकांनी या गोडाऊनमधून मोठ्या प्रमाणात धूर बाहेर पडत असल्याचे दिसल्यानंतर ही माहिती अग्निशमक दलाला सांगण्यात आली. त्यानंतर अग्निशमन दलाचे जवान वेळीच पोहोचल्याने मोठी हानी टाळली. एक ते दीड तासांनी ही आग आटोक्यात आणली.