नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जुने नाशिक परिसरात भद्रकाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत नानावली रस्त्यावर दोन गटात झालेल्या हाणामारीच्या घटनेत तीन जण गंभीर जखमी तर एकाची प्रकृती चिंताजनक आहे. ही घटना रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली आहे. तर या हाणामारीत हत्यारांचा वापर करण्यात आला आहे. या टोळक्याच्या हाणामारीचे कारण समजले नाही. भर रस्त्यावर घडलेल्या या घटनेने शहरातील कायदा, सुव्यवस्था या सोबतच नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये टोळक्यांमधील वादांच्या घटनांतून हाणामारीचे प्रकार समोर येत आहे. या घटनेमुळे सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातारवरण तयार होते.