नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार युवक जखमी झाल्याची घटना सातपूरला अंबड लिंक रोड वर दत्त मंदीर चौकात घडली. किरण सोमनाथ बेंडकुळे (वय २८, म्हाडा कॉलनी चुंचाळे अंबड लिंक रोड) असे अपघातात जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. ३ नोव्हेंबरला आठच्या सुमारास अंबड लिंक रोड वर जखमी किरण बेंडकुळे हा त्याच्या दुचाकीहून जात असतांना पपया नर्सरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाठीमागून येणाऱ्या ट्रक (एमएच ४६ बीएफ ३४२५) ने धडक दिल्याने किरण जखमी झाला. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.