नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – रिक्षा प्रवासात महिलेच्या गळ्यातील सुमारे ७० हजाराची सोन्याचे दागिणे चोरट्यांनी लंपास केल्याची घटना शालीमार ते त्रिमुर्ती चौक दरम्यान घडली. याप्रकरणी सोनाली गोकुळदास पगारे (वय ४०, आशीष अपार्टमेंट त्रिमुर्ती चौक सिडको) यांच्या तक्रारी वरुन अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. शुक्रवारी (दि.४) सोनाली पगारे या रिक्षाने प्रवास करीत असतांना चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील ३३ ग्रॅमची सोन्याची पोत, १७ ग्रॅमचा सोन्याचा हार आणि अडीच ग्रॅमची सोन्याची पोत असा ऐवज लंपास केला.