नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – उधारीचे पैसे परत केले नाही म्हणून तिघांनी घरात घुसून महिलांना मारहाण केल्याचा प्रकार उपनगरला शांतीपार्क भागात घडला. याप्रकरणी सोनू खांडवे, अनिल मोरे आणि एक महिला अशा तिघा विरोधात उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. शुक्रवारी (दि.४) रात्री साडे आठच्या सुमारास उपनगरला शांती पार्क भागातील ड्रिम हेरिटेज येथी सी लिंगमध्ये हा प्रकार घडला. याप्रकरणी प्रियंका संजय हिरे (वय २५) यांच्या तक्रारी नुसार, त्यांच्या बहिणीने सोनू खांडवे याच्याकडून घेतलेले पैसे वेळेत परत केले नाही म्हणून सोनू खांडवे याच्यासह तिघांनी घरात घसुन तिला व तिच्या बहिणी साक्षी आणि अस्मिता यांना मारहाण केली तसेच घरातील टिव्ही, मोबाईल घेउन गेले. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.