नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मेडीकल दुकानातून घरी चाललेल्या महिलेला ॲक्टीवाने धडक दिल्यामुळे ती जखमी झाली. ही घटना अंबडला सरस्वती चौकात घडली. मेघा आशीष दायमा यांच्या तक्रारीवरुन अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेली माहीती अशी उमा अशोकसिंग चव्हाण या मेडीकल दुकानातून औषध घेऊन जात असतांना पाठीमागून पांढऱ्या ॲक्टीवातून दोन्ही बाजूला गोण्या लावून चाललेल्या दुचाकीस्वराने भरधाव वाहन चालवित पाठीमागून धडक देत उमा चव्हाण यांना धडक दिल्याने त्यात, गंभीर जखमी झाल्या.