नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पेठरोडवरील आरटीओ कार्यालय जवळ विरूध्द दिशेने भरधाव आलेल्या आयशर टेम्पोने धडक दिल्याने २० वर्षीय पल्सरस्वार ठार झाला. विशाल गणेश बिमटे (रा.अश्वमेधनगर,आरटीओ कार्यालयासमोर,पेठरोड) असे मृत पल्सरस्वाराचे नाव आहे. बिमटे शुक्रवारी (दि.४) एमएच १५ ईके ११७७ या पल्सर दुचाकीवर प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. पेठफाट्याकडून आरटीओ बाजूच्या दिशेने तो आपल्या दुचाकीवरून जात असतांना विरूध्द दिशेने भरधाव आलेल्या अज्ञात आयशर टेम्पोने त्यास धडक दिली. या अपघातात गंभीर दुखापत झालेल्या विशाल बिमटे याचा मृत्यू झाला असून टेम्पो चालक आपल्या वाहनासह पसार झाला आहे. याप्रकरणी भाऊ मयुर बिमटे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पंचवटी पोलिस ठाण्यात अज्ञात टेम्पो चालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक पडोळकर करीत आहेत.