नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात वेगवेगळय़ा भागात पार्क केलेल्या तीन मोटारसायकली चोरट्यांनी पळवून नेल्या. याप्रकरणी अंबड,उपनगर आणि नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पहिली घटना गांधीनगर भागात घडली. शैलेंद्र यादव (रा.गराडीचाळ,पंचशिलनगर) या युवकाने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. यादव यांची मोटारसायकल एमएच १५ डीए १८८२ गेल्या ९ आॅगष्ट रोजी रात्री त्यांच्या घरासमोर लावलेली असतांना चोरट्यांनी ती चोरून नेली. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास हवालदार शेजवळ करीत आहेत. दुसरी घटना सिन्नर फाटा भागात घडली. किरण बाळासाहेब गायधनी (रा.पळसे ता.जि.नाशिक) यांनी तक्रार दाखल केली आहे. गायधनी गेल्या बुधवारी (दि.२) सिन्नर फाटा भागात आले होते. निसर्ग लॉन्स परिसरात त्यांनी आपली अॅक्टीव्हा एमएच १५ एफझेड ३१९१ पार्क केली असता ती चोरट्यांनी पळवून नेली. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस नाईक पवार करीत आहेत. तिसरी घटना सिडकोत घडली. येथील विकास मच्छींद्र धबडगे (रा.उत्तमनगर) यांची पल्सर एमएच १५ एचके ९६८४ गेल्या २६ ऑक्टोबर रोजी रात्री त्यांच्या घरासमोर पार्क केलेली असतांना चोरट्यांनी ती पळवून नेली. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस नाईक महाजन करीत आहेत.