वेल्डींग करीत असतांना इलेक्ट्रीक शॉक लागल्याने २७ वर्षीय कामगाराचा मृत्यू
नाशिक ( इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आडगावनाका भागात वेल्डींग करीत असतांना इलेक्ट्रीक शॉक लागल्याने २७ वर्षीय कामगाराचा मृत्यू झाला. अब्दूल काशीद रशिद सय्यद (मुळ रा.मुंबई हल्ली आडगाव नाका) असे मृत कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सय्यद गुरूवारी (दि.३) सायंकाळच्या सुमारास स्वामी नारायण चौकीमागील नवीन बांधकाम सुरू असलेल्या हॉलच्या गेटला वेल्डींग करीत असतांना ही घटना घडली. काम करीत असतांना तुटलेल्या इलेक्ट्रीक वायरचा त्यास अचानक इलेक्ट्रीक शॉक लागल्याने ही दुर्घटना घडली. या घटनेत सय्यद बेशुध्द झाल्याने त्यास सोबत काम करणारे फिरोज यांनी तात्काळ जिल्हारूग्णालयात दाखल केले असता डॉ.राहूल पाटील यांनी त्यास तपासून मृत घोषीत केले. अधिक तपास पोलिस नाईक जाधव करीत आहेत.
३५ वर्षीय व्यक्तीची आत्महत्या
नाशिक ( इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ३५ वर्षीय व्यक्तीने आपल्या राहत्या घरात गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना मालधक्कारोडवरील गुलाबवाडी भागात घडली. रतन मुरलीधर साळवे (रा.गुलाबवाडी मालधक्कारोड ना.रोड) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. साळवे यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. साळवे यांनी गुरूवारी (दि.३) सायंकाळच्या सुमारास अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील पंख्याच्या हुकाला प्लॉस्टीक नळी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्यांचा मृत्यू झाला. याबाबत नाना खरे यांनी दिलेल्या खबरीवरून पोलिस दप्तरी मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास जमादार ढगे करीत आहेत.