नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – रविवार कारंजा भागात जुन्या वादातून टोळक्याने प्रवाश्यांच्या प्रतिक्षेत असलेल्या रिक्षाचालकावर धारदार शस्त्राने वार केल्याची घटना घडली. या घटनेत रिक्षाचालक जखमी झाला असून याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उदय चारोस्कर (रा.मायको दवाखान्यामागे,पंचवटी) व त्याचे तीन साथीदार असे रिक्षाचालकावर हल्ला करणा-या संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी राहूल संजय तुरे (२० रा.तीन पुतळयामागे,फुलेनगर) या रिक्षाचालकाने तक्रार दाखल केली आहे. तुरे बुधवारी (दि.२) सायंकाळच्या सुमारास रविवार कारंजा भागातील समर्थ ज्युस सेंटर येथील रिक्षा थांब्यावर आपली रिक्षा पार्क करून प्रवाशांची प्रतिक्षा करीत असतांना ही घटना घडली. संशयित चारोस्कर याने आपल्या साथीदारांसमवेत तुरे यांना गाठून मागील भांडणाची कुरापत काढून त्यांना शिवीगाळ करीत टोळक्याने बेदम मारहाण केली. यावेळी संतप्त चारोस्कर याने तुरे यांच्या पाठीवर धारदार शस्त्राने वार करून जखमी केले असून अधिक तपास उपनिरीक्षक नेमाणे करीत आहेत.