नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – २२ वर्षीय युवकाने आपल्या राहत्या घरात विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याची घटना म्हसरूळ रोडवरील मेरी परिसरात घडली. अजय विष्णू घोडके (२२ रा.निर्मलनगर,मेरी) असे मृत युवकाचे नाव आहे. घोडके याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात मृत्यूची नोद करण्यात आली आहे. घोडके याने गेल्या १७ ऑक्टोबर रोजी सकाळच्या सुमारास अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात विषारी औषध सेवन केले होते. ही बाब निदर्शनास येताच कुटुंबियांनी त्यास तात्काळ आडगाव मेडिकल कॉलेज येथे दाखल केले होते. उपचार सुरू असतांना बुधवारी (दि.२) त्यास वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले.