नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जीवे मारण्याची धमकी देऊन दहा लाखाची खंडणी उकळल्याप्रकरणी सात सराईताविरुध्द सातपूर पोलिस ठाण्यात खंडणीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपा कामगार आघाडी प्रदेशचे पदाधिकारी विक्रम नागरे यांनी यांच्याकडू या टोळक्याने खंडणी घेतली. त्याचप्रणाण घरावर दगडफेक करुन पदाधिका-याचे पोस्टर फाडले. त्यामुळे या प्रकाराची पोलिस स्थानकात नागरे यांनी तक्रार केली.
याप्रकरणात दीपक भास्कर भालेराव,रोशन हरदास काकड,गणेश अशोक लहाने,गौरव उर्फ गुलब्या घुगे,अनिरूद्द शिंदे (रा.सर्व पिंपळगाव बहुला),संजय जाधव (रा,सातपूर कॉलनी) व जया दिवे (रा.पंचवटी) अशी खंडणी उकळणा-या संशयितांची नावे आहेत. सर्व संशयित पोलिस रेकार्ड वरील गुन्हेगार असून त्यांच्यावर खूनासह विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत. याप्रकरणी भाजपा पदाधिकारी विक्रम सुदाम नागरे यांनी तक्रार दाखल केली आहे. हा प्रकार गेल्या वर्षी १ जानेवारी ते ३० ऑक्टोबर दरम्यान घडला. नागरे जानेवारी महिन्यात पिंपळगाव बहुला शिवारातील शेतातून घराकडे येत असतांना दीपक भालेराव आणि रोशन काकड यांनी त्यांना जीवे मारण्याची धमकी देत खंडणीची मागणी केली होती. त्यानुसार वेळोवेळी संशयितांना दहा लाख रूपयांची खंडणी देण्यात आली. मात्र वरिल टोळक्याने गेल्या रविवारी (दि.३०) नागरे यांच्या अशोकनगर येथील घरासमोर दहशत माजवित त्यांच्या घरावर दगडफेक केली. तसेच भाजीबाजारसह परिसरातील पोस्टर फाडल्याने नागरे यांनी पोलिसात धाव घेतली असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक पठाण करीत आहेत.