नाशिक : बनावट कागदपत्राच्या आधारे परस्पर जमिनीचा खरेदी – विक्रीचा व्यवहार प्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जमीन स्व:ताची असल्याचे भासवून सह.दुय्यम निबंधक कार्यालय वर्ग २ कार्यालयात बनावट इसम उभा करून सदर मालमत्तेचा खरेदी विक्री व्यवहाराची नोंदणी करण्यात आली आहे. या फसवणूकीची मुळ मालकाच्या वारसदारांनी तक्रार दिल्यानंतर हा फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कैलास अशोक सोनवणे व अन्य अशी परस्पर जमिनीचा खरेदी विक्री व्यवहार करणा-या भामट्यांची नावे आहेत. याप्रकरणी रविंद्र शांताराम बोरोले (रा.देवदत्त अपा.कॉलेजरोड) यांनी तक्रार दाखल केली आहे. बोरोले यांचे वडिल शांताराम रामभाऊ बोरोले यांनी पिपळगाव बहुला येथील गट नं. १९४ पैकी ४६४.६९ चौ.मी प्लाट आणि नं.११ आणि २७८.८१ चौमी चा प्लॉट नं.३६ असे दोन भूखंड महादू रामजी नागरे यांच्या जनरल मुखत्यार समंतीदार संजीव तुपसाखरे व तुपसाखरे यांच्या कडून सन.१९८१ मध्ये एस.आर.बोरोले या नावाने खरेदी केलेली आहे. सदरची मालमत्ता संशयित कैलास सोनवणे व त्याच्या साथीदारांनी सदरची मालमत्ता बनावट कागदपत्राच्या आधारे स्व:ताची असल्याचे भासवून सह.दुय्यम निबंधक कार्यालय वर्ग २ कार्यालयात बनावट इसम उभा करून सदर मालमत्तेचा खरेदी विक्री व्यवहार केला. ही बाब निदर्शनास येताच बोरोले यांनी पोलिसात धाव घेतली असून पोलिस संशयितांचा शोध घेत आहेत. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक मन्सुरी करीत आहेत.