नाशिक : मेरी कॉलनीत बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी लॅपटॉप व रिकनेक्टेड चोरून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिपक वासूदेव लांभाते (मुळ रा.फलटन,जि.सातारा हल्ली कोवीड सेंटर जवळ,मेरी कॉलनी) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. लांभाते २३ ते २९ ऑक्टोबर दरम्यान बाहेरगावी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून सुमारे २० हजार रूपये किमतीचा लॅपटॉप व रिकनेक्टेड चोरू नेला. अधिक तपास उपनिरीक्षक कासर्ले करीत आहेत.