नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा ) – भरदिवसा झालेल्या धाडसी घरफोडीत चोरट्यांनी सुमारे अडीच लाखाचा एेवज लंपास केला. ही घटना देवळाली कॅम्प येथील धोंडीरोड भागात घडली. या घरफोडीत चोरट्यांनी सोन्याचांदीच्या दागिने चोरुन नेले. या घरफोडी प्रकरणी रोहिग्टन फरदीन देवळालीवाला (रा.धोंडीरोड) यांनी तक्रार दाखल केली असून देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देवळालीवाला कुटुंबिय भाऊबीज निमित्त बुधवारी (दि.२६) सायंकाळच्या सुमारास नजीक राहणा-या नातेवाईकांकडे गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे सेंट्रल लॉक तोडून बेडरूममधील कपाटातून सुमारे २ लाख ३६ हजार रूपये किमतीचे सोन्याचांदीचे दागिणे चोरून नेले. अधिक तपास उपनिरीक्षक पाडवी करीत आहेत.